Patra Chawl Land Scam Case: संजय राऊत यांना ED कडून नवं समन्स; 1 जुलैला हजर राहण्याचे आदेश
आज अलिबाग मध्ये संजय राऊतांचा दौरा असल्याने त्यांनी ईडी कार्यालयात उपस्थित राहू शकत नसल्याचं कारण दिलं होतं.
संजय राऊत यांची आजची ईडी कार्यालयातील चौकशी आता 1 जुलैला होणार आहे. त्याबाबतचं नवं समन्स जारी करण्यात आले आहे. संजय राऊतांनी आज मुंबई ईडी कार्यालयात गैरहजर राहत वकिलांकरवी अधिकचा वेळ मागून घेतला होता. राऊतांकडे 14 दिवसांच्या मुदतीचा अर्ज देण्यात आला आणि तो स्वीकरला देखील गेल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली मात्र आता नव्या नोटिसीनुसार राऊतांना 1 जुलैला ईडी कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. या चौकशीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवण्याचे आदेशही ईडीने बजावले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement