Mumbai: मुंबई विमानतळावर 60 कोटींचे अमली पदार्थ जप्त, महिलेने ट्रॉली बॅग आणि फाईल फोल्डरमध्ये लपवले
महिलेने तिच्या ट्रॉली बॅग आणि फाइल फोल्डरमध्ये हे ड्रग्ज लपवून ठेवले होते. AIR इंटेलिजन्स युनिट (AIU) ने अमली पदार्थ जप्त करण्याची ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील लवकर कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई विमानतळावरून 60 कोटी रुपयांचे अम्ली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई कस्टम विभागाने एका झिम्बाब्वेच्या महिलेला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. 12 फेब्रुवारीला झिम्बाब्वेहून मुंबई विमानतळावर आलेल्या महिलेच्या झडतीत 6 किलो हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 60 कोटी इतकी आहे. त्या महिलेने तिच्या ट्रॉली बॅग आणि फाइल फोल्डरमध्ये हे ड्रग्ज लपवून ठेवले होते. इंटेलिजन्स युनिट ने अमली पदार्थ जप्त करण्याची ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील लवकर कारवाई करण्यात येत आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)