Dr. B R Ambedkar Jayanti 2025 Tour Circuit: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 व 15 एप्रिल 2025 रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे मोफत टूर सर्कीटचे आयोजन

या टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली नागरिक, पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत.

Dr. Babasaheb Ambedka | (Photo Credits: Wikipedia Commons)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून, मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे 14 व 15 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. या टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली नागरिक, पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत. या टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बि.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. प्रत्येक शहरात दररोज दोन बसेसद्वारे सहल, टूर गाइड, अल्पोपहार, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे वितरण केले जाईल. (हेही वाचा: Ambedkar Jayanti Wishes Using AI: आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छापत्रासाठी एआय वापरून 'असे' तयार करा संदेश, कोट्स आणि ग्रीटिंग कार्ड)

Dr. B R Ambedkar Jayanti 2025 Tour Circuit:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू

IND-W vs SL-W 4th ODI 2025 Mini Battle: श्रीलंका विरुद्ध भारत महिला संघ तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना; मिनी बॅटलमध्ये 'हे' खेळाडू एकमेकांना ठरू शकतात अडचणीत

IND-W vs SL-W 4th ODI 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेमध्ये होणार; सामन्यापूर्वी स्ट्रीमिंगसह सर्व तपशील जाणून घ्या

QG vs ISL PSL 2025 Live Streaming: पाकिस्तान सुपर लीगमध्ये आज क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात रोमांचक सामना; भारतात लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement