Mumbai: शहरात कलम १४४ लागू करणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिससह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं मुंबईकरांना आवाहन

मुंबईत कलम १४४ लागू करणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं पोलिससह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे.

Vishwas Nangre Patil (Photo Credit: Twitter)

मुंबईत (Mumbai) पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा (Section 144) आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल, आशयाची अफवा सोशल मिडीयावर (Social Media) पसरवल्या जात आहे. तसेच काही वृत्तवाहिन्यांकडून देखील या प्रकारची बातमी प्रदर्शित करण्यात आली आहे. तरी नागरीकांनी यासारख्या कुठल्ही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी केलं आहे. तसेच जमावबंदी किंवा यासारखा कुठल्याही प्रकारचा निर्णय मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) घेण्यात आला नाही असं नांगरे पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement