Diwali 2021 School Holiday: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना 28 ऑक्टोबर -10 नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिवाळीच्या सुट्टीत ऑनलाईन शिक्षणही बंद असेल असे सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान केवळ 14 दिवसांची दिवाळीची सुट्टी असणार आहे. कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा काही दिवसांपूर्वीच राज्यभर सुरू झाल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिवाळीच्या सुट्टीत ऑनलाईन शिक्षणही बंद असेल असे सांगितले आहे.
वर्षा गायकवाड ट्वीट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/KaAMvHDadk
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2021 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

