Distracting video: डांबराच्या पिंपात अडकली कुत्र्याची पिल्ले, पाहा व्हिडिओ
पुणे येथून एक लक्ष विचलीत करणारा व्हिडिओ पुढे येत आहे. हा व्हिडिओ डीएसके सोसायटी, पारगे नगर, कोंढवा येथील असल्याचे समजते. या ठिकाणी एका डांबराच्या पिंपात कुत्र्याची दोन पिल्ले अडकली होती. डांबर गोठल्याने ही पिल्ले अडकून पडली होती. अतिशय हेलावून टाकणाऱ्या या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या पिल्लांची सूटका करुन जीवदान दिले.
पुणे येथून एक लक्ष विचलीत करणारा व्हिडिओ पुढे येत आहे. हा व्हिडिओ डीएसके सोसायटी, पारगे नगर, कोंढवा येथील असल्याचे समजते. या ठिकाणी एका डांबराच्या पिंपात कुत्र्याची दोन पिल्ले अडकली होती. डांबर गोठल्याने ही पिल्ले अडकून पडली होती. अतिशय हेलावून टाकणाऱ्या या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान पोहोचले तेव्हा त्यांना रस्त्यावरील एका ठिकाणी डांबराने भरलेले पिंप दिसले. ज्यात ही दोन पिल्ले अडकली होती. काही सर्प मित्र आणि प्राणिमित्रही या ठिकाणी पोहोचले.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी उपकरणांचा वापर करुन पिंप कापला. त्यानंतर पिंपाचे दोन भाग केले आणि दोन्ही पिल्ले अलगतपणे बाहेर काढली. त्यानंतर या पिल्लांना विशिष्ठ तेलाचा वापर करुन अंघोळ घालण्यात आली. ज्यामुळे डांबर वितळून गेले आणि या पिल्लांना जीवदान मिळाले.
व्हिडिओ