Diamond Merchant Dies By Suicide: मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ 65 वर्षीय डायमंड मर्चंटची आत्महत्या; आठवडाभरातील दुसरी घटना

त्यानंतर काही वेळातच त्यांनी खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. ही घटना पाहणाऱ्या व्यक्तीने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली.

Representational Image (File Photo)

Diamond Merchant Dies By Suicide: दक्षिण मुंबईतील 65 वर्षीय हिरे व्यापाऱ्याने रविवारी सकाळी गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आठवडाभरातील ही अशी दुसरी घटना आहे. याआधी घाटकोपर येथे राहणाऱ्या भावेश नागीन सेठ या व्यावसायिकाने 17 जुलै रोजी वरळी-वांद्रे सी लिंकवरून उडी मारून आपले जीवन संपवले होते. व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ते नैराश्यात होते.

आता रविवारी सकाळी सातच्या सुमारास शीला अपार्टमेंट, भुलाभाई देसाई रोड, महालक्ष्मी येथे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसह राहणारे संजय शांतीलाल शहा हे पत्नीला फिरायला जात असल्याची माहिती देऊन, अपार्टमेंटमधून बाहेर पडले. कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 वाजता ते कॅबने गेटवे ऑफ इंडियावर पोहोचले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. ही घटना पाहणाऱ्या व्यक्तीने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्यानंतर ताबडतोब मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी ज्या ठिकाणी शहा यांनी समुद्रात उडी मारली होती त्या ठिकाणी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनंतर, बचाव पथकाने त्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश मिळवले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सेंट जॉर्ज रुग्णालयात शहा यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: INS Brahmaputra मध्ये आग; एका बाजूने झुकले जहाज, एक खलाशी बेपत्ता)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)