Nagpur Poshan Aahar: शासनाचा लहानग्यांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारात आढळली मृत चिमणी

यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Poshan Aahar :  लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा लहानग्यांसाठी चांगल्या नसल्याचे समोर आले आहे. कारण नागपूरमध्ये लहान मुलांच्या पोषण (Nagpur Poshan Aahar)आहारामध्ये मृत चिमणी आढळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात पोषण आहारामध्ये चिमणी आढळली आहे. नागपूरात पारशिवानी तालुक्यातील घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लहान मुलांच्या आहारात मृत चिमणी आढळल्याने खळबळ उडाली आहे. निल नेहाल शिंदेकर यांच्या घरी देण्यात आलेल्या पोषण आहारात ही मृत चिमणी आढळली आहे. ० ते ३ वयोगटातील मुलांना हा पोषण आहार दिला जात होता. पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पोस्ट पहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif