Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status
भारतीय हवामान खात्याच्या मते, 22 ते 28 मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे शनिवार, 24 मे पर्यंत किंवा पुढील 36 तासांत आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे. विंडीच्या चक्रीवादळाच्या लाईव्ह ट्रॅकरवरून महाराष्ट्राच्या रत्नागिरीजवळील कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळाचे वातावरण असल्याचे दिसून आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते, 22 ते 28 मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट आणि रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, हवामान तज्ञ पुढील एक-दोन दिवस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. (हेही वाचा: IMD Weather Alert: मुंबई, दिल्ली आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 24 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)
Cyclone Shakti Windy Live Tracker:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)