Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई सुरु असताना सरन्यायाधीशासह मुख्यमंत्र्याच्या भेटीवर विरोधकांचं टीकास्त्र

विरोधकांकडून या भेटीवर निशाणा साधण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Politics) लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे.  तारीख पे तारीखचं सत्र सध्या सर्वोच्च न्यायालयात बघायला मिळत आहे. तरी खरी शिवसेना (Shiv Sena) नेमकी कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची हा तिढा अजुनही कायम आहे. तरी काल मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत ( CJI Uday Lalit) यांनी एकाच व्यासपिठावर हजेरी लावली होती. तरी विरोधकांकडून यावर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि कॉंग्रस नेते सचिन सावंत यांनी सरन्यायाधीशासह मुख्यमंत्र्याच्या या भेटीबाबत आपत्ती व्यक्त केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif