'मुंबईच्या विकासात गुजराती-राजस्थानी समाजाचे योगदान मान्य करावे'; राज्यपालांच्या माफीनंतर Sanjay Nirupam यांची प्रतिक्रिया

खूप चांगले केले.

संजय निरुपम (Photo Credits-Twitter)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. 'राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो,' असे ते म्हणाले आहेत. आता त्यानंतर संजय निरुपम यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. ते म्हणतात, 'महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. खूप चांगले केले. त्यांच्या वक्तव्यामुळे मुंबईतील मराठी भाषिक समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. याचा अर्थ मुंबईच्या जडणघडणीत गुजराती-राजस्थानी समाजाचे योगदान नाही, असे नाही. प्रत्येकाचे योगदान आहे, हे मान्य केले पाहिजे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)