Mumbai Police: अटकेची नोटीस, धमकी मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करा; मुंबई पोलिसांचे अवाहन
तुम्हाला जर सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, मेसेज अथव फोनद्वारे अटक अथवा कायदेशीर कारवाई करण्याबाबत संदेश प्राप्त झाला तर घाबरु नका. तुम्ही थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाने केले आहे.
पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, काही अज्ञात शक्तींकडून अथवा सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर संपर्क साधला जातो आहे. हे लोक सामान्य नागरिकांना कायदेशीर कारवाई करण्याचे अथवा अटक करण्याची धमकी देतात. त्यामुळे नागरिकांनी अशा धमक्यांना भिक घालू नका. थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांकडून अवाहन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)