Congress on Maharashtra Election Results: 'आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो, जनतेसाठी काम करत राहू'- कॉंग्रेस
महाराष्ट्र निवडणूक निकालांवर राहुल गांधी म्हणाले की, हे अनपेक्षित आहेत. आम्ही त्याचे तपशीलवार विश्लेषण करू. राज्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील आघाडी 'महायुती'च्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विधानसभेच्या 288 जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीला 233 पर्यंत जागा मिळाल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडी (MVA) 50 चा आकडाही पार करू शकली नाही. एकीकडे भाजप आणि मित्रपक्ष या निकालांवर खूश आहेत, तर काँग्रेसने या निकालांवर नाखुशी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसने म्हटले आहे, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो. जनतेचे महत्त्वाचे प्रश्न आम्ही मांडत आलो आहोत. त्यांचा आवाज बनत आलो आहोत, हे काम आम्ही ताकदीने करत राहू. धन्यवाद.’
यासह महाराष्ट्र निवडणूक निकालांवर राहुल गांधी म्हणाले की, हे अनपेक्षित आहेत. आम्ही त्याचे तपशीलवार विश्लेषण करू. राज्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद. (हेही वाचा: Uddhav Thackeray On Mahayuti Victory: 'आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय'; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया)
Congress on Maharashtra Election Results:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)