Hanuman Chalisa By Congress: कर्नाटकात विधानसभा निवडणूकीतील दणदणीत विजया नंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस नेत्यांनी वाचली 'हनुमान चालीसा' (Watch Video)
मुंबई मध्ये भाई जगताप, संजय निरूपम यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी हनुमान चालीसा वाचली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये 'बजरंग बली' देखील प्रचारामध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. पण कर्नाटकवासियांनी सत्ताबदलाची परंपरा कायम ठेवत भाजपाच्या हातातील सत्ता कॉंग्रेसच्या हातात नेऊन ठेवली. दरम्यान या निवडणूक निकालानंतर कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण चढले आहे. पण त्या सोबतीने महाराष्ट्रातही कॉंग्रेस नेत्यांनी सेलिब्रेशन केले आहे. मुंबई मध्ये अंधेरी परिसरामध्ये भाई जगताप, संजय निरूपम यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी हनुमान चालीसा चे पठण केले आहे. Karnataka Election Results 2023: काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावण्यात आल्याचा नेटिझन्सचा दावा, पाहा व्हिडिओ .
पहा ट्वीट
हनुमान चालीसा पठन आज अँधेरी में।
बजरंग बली की जय !#KarnatakaResults pic.twitter.com/GBnc1CDiZs
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

