Maharashtra Winter Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट! हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी थंडीची लाट ते तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Winter | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस कडाक्याच्या थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असुन गेल्या आठवड्यात सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी थंडीची लाट ते तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा-मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now