Coastal Road Arm Inaugurated In Worli: आता मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अंतर अवघ्या 10 मिनिटांत; CM Eknath Shinde यांच्या हस्ते कोस्टल रोड आर्मचे उद्घाटन (Video)
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितले की, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर आता वाहनधारक 10 मिनिटांत पूर्ण करू शकतात. याआधी या अंतरासाठी 50 मिनिटे लागायचे.
Coastal Road Arm Inaugurated In Worli: आज धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा पूल मरीन ड्राईव्हला वांद्रेशी जोडेल आणि वाहनधारकांना सिग्नलमुक्त प्रवास उपलब्ध करून देईल. कोस्टल रोडच्या पहिल्या भागाचे उद्घाटन यावर्षी मार्चमध्ये झाले. आज उद्घाटन करण्यात आलेला विभाग हा दक्षिणेकडील बाजूचा एक भाग आहे आणि पुढील शेवटचा भाग पुढील 3 ते 4 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
वरळीतील बिंदू मांडव ठाकरे चौकात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि बीएमसीचे माजी प्रमुख आणि आता मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंग चहल हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितले की, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर आता वाहनधारक 10 मिनिटांत पूर्ण करू शकतात. याआधी या अंतरासाठी 50 मिनिटे लागायचे. पुढे जेव्हा वांद्रे-वर्सोवा आर्म पूर्ण होईल, तेव्हा वाहनचालक दक्षिण मुंबईहून वर्सोव्याला 40 मिनिटांत पोहोचतील. सध्या या अंतराला 2 ते 3 तास लागतात. (हेही वाचा: Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग)
कोस्टल रोड आर्मचे उद्घाटन-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)