Change In Panvel Suburban Platforms: पनवेल स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये आजपासून बदल; प्रवाशांनो! गोंधळ टाळण्यासाठी पहा रेल्वेची ही सूचना
यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे पनवेल रेल्वेस्थानकात हा बदल करण्यात आला आहे.
पनवेल स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये आजपासून बदल करण्यात आले आहे. मागील विकेंडलाच 38 तासांचा ब्लॉक घेत महत्त्वाचे काम रेल्वेकडून करण्यात आल्यानंतर आजपासून त्यांनी प्लॅटफॉर्म नंबर बदलले आहे. हे बदल Suburban Platforms मध्ये केले त्यामुळे आता पूर्वीचा प्लॅटफॉर्म नंबर 4 काढून टाकण्यात आला आहे तर 1 आणि 3 मध्ये अदलाबदल केली आहे. आज या बदलाची माहिती नसल्याने सकाळी अनेक प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला होता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)