Boulders on Pune-Mumbai Railway: महाराष्ट्रात मोठा ट्रेन अपघात टळला; पुणे-मुंबई रेल्वे ट्रॅकवर आढळले दगड, कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवले (Video)

पुणे-मुंबई रेल्वे मार्गाच्या अप मार्गावर आकुर्डी ते पिंपरी रेल्वे स्थानकादरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवलेले आढळून आले.

Boulders on Pune-Mumbai Railway

देशात रेल्वे ट्रॅकवर दगड ठेऊन गाड्या उलटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र रेल्वे अशा उपद्रवी लोकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात असाच एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुणे-मुंबई रेल्वे मार्गाच्या अप मार्गावर आकुर्डी ते पिंपरी रेल्वे स्थानकादरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवलेले आढळून आले. हे दगड प्रथम लोणावळा-पुणे लोकल ट्रेनचे गार्ड संदीप भालेराव यांना दिसले, त्यानंतर या प्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली.

भालेराव यांनी ही माहिती चिंचवड स्टेशन मास्टर मॅथ्यू जॉर्ज यांना दिली व त्यांनी पुढे ट्रेन क्र. 16352 च्या लोको पायलट आणि गार्डला ही माहिती दिली. त्यानंतर रेल्वे रुळावरील दगड हटविण्याचे काम सुरू झाले. याआधी सोमवारी अशाच एका घटनेत उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या ट्रॅकवरही असेच दगड ठेवलेले आढळले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now