Bomb Threats: मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब ठेवल्याचा दावा; नागपूर पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा कॉल

नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना या निनावी कॉलबद्दल सतर्क केले असून, त्यानंतर बॉम्बशोधक पथके सर्व ठिकाणी शोध घेत आहेत.

Maharashtra Police | (File Photo)

एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा बंगला आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना या निनावी कॉलबद्दल सतर्क केले असून, त्यानंतर बॉम्बशोधक पथके सर्व ठिकाणी शोध घेत आहेत. यासह हा कॉल नक्की कुठून आला व कुणी केला याचाही शोध घेतला जात आहे. मिडडेने याबाबत वृत्त दिले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now