Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result: विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेचा विजय; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना 26 मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा निर्माण झाली होती.

Pankaja Munde | (Photo Credit - Twitter)

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result: विधानपरिषद निवडणुकींचा निकाल (Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result) हाती आला आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा विजय झाला आहे. 2019 च्या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांनी पंकजा मुंडे यांना राजकीय सत्ता मिळाली आहे. आज पंकजा मुंडे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचे कुटुंब विधानभवनात उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना 26 मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा निर्माण झाली होती. मात्र, आता पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषदेतील विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now