Beware! Suspicious Strawberries in Market: पुण्यातील बाजारात दिसल्या लाल रंगाचे पाणी लावलेल्या स्ट्रॉबेरीज; FDA ने सुरु केली जनजागृती मोहीम (Watch Video)
त्यानंतर आता केवळ अन्नच नव्हे तर फळांमधील भेसळीबाबतही लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Suspicious Strawberries in Market: पुण्यात बाजारात आलेल्या 'संशयास्पद' स्ट्रॉबेरीबद्दल नेटिझन्सनी अनेक तक्रारी केल्या होत्या. सोशल मिडियावरही याबाबत चर्चा सुरु होती. आता या वाढत्या तक्रारींची राज्य एफडीए (FDA) ने दखल घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाने भेसळीविरुद्ध युद्ध पुकारले आहे. एफडीएने रविवारी जनजागृती मोहीम राबवली आणि नागरिकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ, फळे किंवा भाजीपाला वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले. लोक या मोहिमेद्वारे एफडीएला संशयास्पद उत्पादनांचा पुरावा म्हणून व्हिडिओ आणि प्रतिमा सबमिट करून योगदान देऊ शकतात. पुण्यातील मॉल्समध्ये संशयास्पद लाल रंगाने भरलेल्या स्ट्रॉबेरीकडे काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लक्ष वेधल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यानंतर आता केवळ अन्नच नव्हे तर फळांमधील भेसळीबाबतही लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा स्ट्रॉबेरीज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसत आहे की स्ट्रॉबेरीजच्या बॉक्समधून लाल रंगाचे पाणी गळत आहे. रसायनयुक्त अन्न आणि फळांमुळे जीवघेण्या आजारांची पुष्टी करताना, ऑन्कोलॉजिस्ट डॉ सुमित शाह म्हणाले की, '2035 पर्यंत अन्नाशी संबंधित रोग सर्वात घातक मारेकरी म्हणून राज्य करतील. सध्या ग्राहकांना फसवण्यासाठी घातक रसायने, कीटकनाशके आणि कृत्रिम रंगांचा सर्रास वापर होत आहे. टरबूज, सफरचंद आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांवर रसायने आणि रंग वापरले जातात. एकेकाळी पौष्टिक असलेली ही फळे आता धोकादायक बनली आहेत. त्यामुळे अशा फळांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)