Badlapur School Case: बदलापूर आदर्श शाळा घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; नराधमांना तात्काळ शिक्षा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची फडणवीसांची माहिती
अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना पुढे येताच बदलापूर येथे तणाव निर्माण झाला आहे.
बदलापूर संतप्त पालकांनी आदर्श शाळेवर (Adarsh School ) मोर्चा काढला आणि फाटकावर निदर्शनेही केली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील. असे फडणवीस यांनी म्हटले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)