Bachpan Bachao Andolanची Supreme Court त धाव; शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या याचिकेवर जलद सुनावणीची मागणी
देशातील शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी बचपन बचाओ आंदोलनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Bachpan Bachao Andolan moved to Supreme Court: बदलापूरमध्ये नामांकीत शाळा आदर्श हायस्कूलमध्ये (Badlapur Sexual Assault Case)लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची घटना घडली. परिणामी शाळांमध्ये लहान मुलींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालक वर्गात त्यांच्या मुलींच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण होत आहे. देशातील शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी बचपन बचाओ आंदोलनाने (Bachpan Bachao Andolan)सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)धाव घेतली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने 24 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
24 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)