Ashram School to Reopen: महाराष्ट्रातील निवासी, आश्रमशाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार- मंत्री विजय वडेट्टीवार

आश्रमशाळा 1 डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत

Vijay Wadettiwar (Photo Credits: Facbook)

बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी, अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा 1 डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व शहरी भागातील महापालिका हद्दीतील इयत्ता चौथीचे वर्ग असलेल्या शाळा दि. 01 डिसेंबर, 2021 पासून सुरु करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आश्रमशाळा तसेच (वसतीगृहासह) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी व अनिवासी आश्रमशाळांनी, कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now