Special Session of Parliament: गणेशोत्सवाच्या दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन ठेवल्याने विरोधक नाराज

गणेशोत्सवाच्या दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन ठेवल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार अरविंद सावंत (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. यात पाच बैठका होतील, अशी माहिती आहे.  दरम्यान गणेशोत्सवाच्या दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन ठेवल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासाठी सरकारवर टिका केली. "संसदेच्या इतिहासात सणासुदीत एकही अधिवेशन झाले नाही. गणपती उत्सवाच्या दिवसात त्यांनी अधिवेशने ठेवली. हे त्यांचे हिंदुत्व आहे," असे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement