Anil Deshmukh Attack Case: अनिल देशमुख यांच्यावर हल्ला प्रकरणी 4 अज्ञातांविरूद्ध Attempt to Murder चा गुन्हा दाखल
अनिल देशमुख नरखेड गावातील एका सभेत सहभागी होऊन काटोलकडे परतत असताना रात्री आठच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला.
महाराष्ट्रामध्ये काल विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशावेळी नागपूर मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा हल्ला झाला आहे. आज या प्रकरणामध्ये 4 अज्ञातांविरूद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SP, Nagpur Rural, Harsh Poddar यांनी ही माहिती दिली असून Regional Forensic Team कडून घटनास्थळावर पुरावे हाती घेतल्याचं सांगण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी अफवा पसरवू नये आणि जे कोणी कायदा व सुवव्यस्था बिघडवण्याचं काम करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.
हत्येच्या प्रयत्नाचा चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)