Amravati Violence: तणावाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी शहरभर फिरून लोकांची केली विचारपूस, दिला आधार

राज्यातील जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला आहे.

Yashomati Thakur (Photo Credit: )

त्रिपुरा हिंसाचाराचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये काल अमरावती येथील परिस्थिती चिघळली. अमरावतीतील तणावाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ॲड यशोमती ठाकूर आणि सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. इतक्या तणावाच्या परिस्थितीतही ताईंनी शहरभर फिरून लोकांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला, निडर राहण्याचा सल्ला दिला. खास करून लहान मुले आणि महिलांना आधार दिला. सर्व पक्षीय, सर्व धर्मीय नागरिकांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. एकाही दोषीला मोकळे सोडणार नाही, अमरावतीत यापुढे अशा घटना घडू देणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी ठणकावून सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)