Lok Sabha Election 2024 Results: शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हेंचा सलग दुसऱ्यांदा विजय; खास पोस्ट शेअर करत मानले मायबाप जनतेचे आभार!

या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की,

Amol Kolhe | (Photo Credit: Instagram)

Lok Sabha Election 2024 Results: शिरूर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. कोल्हेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की, 'आव्हान सोपं नव्हतं... दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ...हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं... मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला. हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो !'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)