Alcohol & Non-Veg Ban on 22 January: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दारू आणि मांसाहारावर येणार बंदी? भाजप आमदार Ram Kadam यांची सरकारकडे मागणी (Watch Video)

कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेता 22 जानेवारीला राज्यात दारू आणि मांसविक्रीवर पूर्ण बंदी घालावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

BJP MLA & spokesperson Ram Kadam

Alcohol & Non-Veg Ban on 22 January: अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेकाबद्दल महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी तब्बल 450 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. अशा परिस्थितीत हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेता 22 जानेवारीला राज्यात दारू आणि मांसविक्रीवर पूर्ण बंदी घालावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. या एके दिवशी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्र सरकारकडे करतो असे ते म्हणत आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडिया X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. (हेही वाचा; Ram Mandir Invitation Card Video: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्यास सुरुवात; व्हायरल झाला कार्डचा सुंदर व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)