Ajit Pawar Tests Positive for COVID 19: अजित पवार यांना कोविड 19 ची लागण
अजित पवार यांना दुसर्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज ट्वीट करत त्यांनी याची माहिती दिली आहे. ट्वीट मध्ये प्रकृती चांगली असून डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचंही सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
Ajit Pawar Tweet
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2022 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

