गणेश उत्सवानिमित्त राष्ट्रवादीनं शेअर केलेल्या ॲनिमेटेड प्रचार गीताचा Video Viral
जनतेशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा सुरू केली आहे.
काल ही यात्रा गडचिरोलीत होती. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचारासाठी, समर्थक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर नवनवीन तंत्राचा अवलंब करताना दिसत आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादीने पक्षानं एक्सवर शेअर केलेल्या ॲनिमेटेड व्हिडिओत अनेक कल्याणकारी योजनांचा समावेश करण्यात आलाय. माझी लाडकी बहीण योजना, ज्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये स्वावलंबन निधी दिला जात आहे. 1 कोटी 60 लाख लाभार्थींना याचा हप्ता आधीच मिळाला आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत 52 लाख कुटुंबांना मोफत सिलिंडर मिळत आहेत, त्याचे श्रेय गणपती बाप्पाला जाते, असं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)