Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल; चौकशी सुरु
आदर्श विद्या मंदिर च्या सफाई कर्मचार्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर मध्ये आदर्श विद्यालय (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case) च्या दोन विद्यार्थींनीवर शाळेत सफाई कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. आता या घटनेच्या चौकशीला वेग आहे. बदलापूरच्या शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल झाली आहे. दोन्ही टीमकडून घटनास्थळाचा तपास केला जाणार आहे. तर शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका यांचीही चौकशी सुरू आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)