महाराष्ट्रात MH CET परीक्षेमध्येही गोंधळ झाल्याचा म्हणत आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे मार्क्स टॉपर्स जाहीर करण्याची केली मागणी
महाराष्ट्रातील MH-CET परिक्षांमधील गोंधळाबद्दल आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
देशात नीट परीक्षेच्या घोटाळ्यानंतर आता राज्यातही सीईटी परीक्षेत गोंधळ असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रात नुकताच सीईटीचा निकाल लागला आहे पण या निकालात विद्यार्थ्यांना मार्क्स न दाखवता केवळ पर्सेंटाईल दाखवण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नावलीतील चूका ते निकालांमध्ये काही गोष्टी लपवून ठेवण्यावरून सीईटी सेल आणि राज्य सरकार वर आदित्य ठाकरेंनी तोफ डागली आहे. आमची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी नाही पण परीक्षेचं स्वरूप, निकाल लावण्याचे प्रकार यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)