Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ कॉन्स्टेबलने वाचवले महिलेचे प्राण, थरारक व्हिडिओ आला समोर
मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने धैर्याने एका महिलेचा जीव वाचवला.
मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने धैर्याने एका महिलेचा जीव वाचवला. ही घटना ५ जानेवारीला घडली. महिला प्रवासी धावता धावता ट्रेन पकडत होत्या तिची साडी ट्रेनच्या एका दारात अडकली होती. हे पाहून आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने प्रसंगावधान जाणून महिलेचे प्राण वाचवले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ट्रेनमध्ये चढत असताना साडी अडकली आणि चालत्या ट्रेनमधून तिला प्लॅटफॉर्मवर ओढले जात होते. त्यानंतर लगेच आरपीएफ कॉन्स्टेबलने महिलेला हात देऊन वाचवले. आरपीएफ कॉन्स्टेबल वैशाली पटेल असं प्राण वाचवणाऱ्या महिलेचे नाव आहे. पीडीत महिला ही कल्याण हून नाशिकला जात होती.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)