प्रेमप्रकरणातून Boisar मध्ये भरदिवसा मुलीवर झाडली गोळी, तरुणीचा मृत्यू, नंतर आरोपीनेही केली आत्महत्या

या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Firing

पालघरमध्ये एक भयानक घटना घडली आहे. जिल्ह्यातील बोईसर (Boisar) परिसरात भरदिवसा एका तरुणाने रहदारीच्या ठिकाणी एका तरुणीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाने गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गोळीबारानंतर तरुणाने आत्महत्या केली. रस्त्यात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकसमोर तो स्वतः गेला. त्यामुळे तो ट्रकखाली चिरडला गेला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now