Glass Consignment Falls At Manufacturing Unit In Pune: पुण्यातील उत्पादन युनिटमध्ये काचेची खेप अंगावर पडल्याने 4 कामगारांचा मृत्यू, एक जखमी
अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी झालेल्या पाच कामगारांना बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी चार जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
Glass Consignment Falls At Manufacturing Unit: पुणे शहरातील एका उत्पादन युनिटमध्ये काचेची खेप वाहनातून उतरवताना अंगावर पडल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला कात्रज परिसरात असलेल्या एका काचेच्या उत्पादन युनिटमध्ये काचेचा साठा उतरवताना पाच ते सहा कामगार अडकल्याचा फोन आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी झालेल्या पाच कामगारांना बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी चार जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे.
पुण्यातील उत्पादन युनिटमध्ये काचेची खेप अंगावर पडल्याने 4 कामगारांचा मृत्यू -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement