Dharohar Bharat Ki Documentary Live Streaming: आज रात्री 8 वाजता दूरदर्शनवर पहा 'धरोहर भारत की' डॉक्युमेंटरी; दर्शविली जाईल भारतीय सभ्यतेची भव्यता व प्राचीन संस्कृतीची पुनर्रचना

दूरदर्शन वाहिनीशिवाय जिओ सिनेमावर 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. माहितीपटात भारताच्या सांस्कृतिक पैलूची ओळख करून दिली जाणार आहे.

Dharohar Bharat Ki Documentary

देशाचा इतिहास, पुरातत्व आणि वारसा जाणून घेण्याची आवड असणाऱ्यांना मोठी मेजवानी मिळणार आहे. राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर एक विशेष माहितीपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये भारतीय सभ्यतेची भव्यता, प्राचीन संस्कृतीची पुनर्रचना दर्शविली जाईल. दोन भागांमध्ये बनवलेल्या या माहितीपटाचे नाव, 'धरोहर भारत की पुनरुत्थान की कहानी', असे आहे.

दूरदर्शन वाहिनीशिवाय जिओ सिनेमावर 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. माहितीपटात भारताच्या सांस्कृतिक पैलूची ओळख करून दिली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या माहितीपटात दिसणार आहेत. दोन भागांच्या या माहितीपटात भारतीय सभ्यतेच्या प्रतिकांचे जतन, प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची पुनर्बांधणी आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान दाखविण्यात येणार आहे. (हेही वाचा: दूरदर्शन वरील ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचे PM Narendra Modi यांचे नागरिकांना आवाहन)

दूरदर्शनवर पाहू शकाल माहितीपट 'धरोहर भारत की'- 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement