Zika Virus in Mumbai: मुंबईत झिका व्हायरसच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी; नागरिकांनी घाबरून न जाण्याचे BMC चे आवाहन

प्रसिद्धीनुसार, या वृद्ध व्यक्तीला 19 जुलै 2023 रोजी ताप, नाक बंद होणे आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर खाजगी प्रॅक्टिसमध्ये डॉक्टरांकडून लक्षणात्मक उपचार घेतले.

झिका व्हायरस (Photo Credit: PTI)

मुंबईत झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मुंबईत सापडलेल्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी करणारी माहिती शेअर केली आहे. झिका विषाणूचा संसर्ग 79 वर्षीय व्यक्तीमध्ये आढळून आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवेदनानुसार, हा वृद्ध नागरिक सध्या निरोगी आणि बारा आहे. झिका व्हायरसच्या पहिल्या प्रकरणाची माहिती देताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकांना घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन केले आहे.

प्रसिद्धीनुसार, या वृद्ध व्यक्तीला 19 जुलै 2023 रोजी ताप, नाक बंद होणे आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर खाजगी प्रॅक्टिसमध्ये डॉक्टरांकडून लक्षणात्मक उपचार घेतले. रुग्ण बरा झाल्यानंतर 2 ऑगस्ट रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, वृद्धामध्ये संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथून संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. झिका संसर्ग हा स्वत: बरा होणारा आजार असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे बीएमसीने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्परुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार

Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement