Monkey Pox: राज्यात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण, घाबरु नका पण काळजी घ्या असा तज्ञांचा सल्ला
राज्यात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण सापडले आहेत तरी त्यात घाबरुन जाण्यासारखं काहीही नसुन सगळं काही नियंत्रणात असल्याची माहिती डॉ प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.
कोव्हिड महामारीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा खूप काही शिकली तसेच त्यात गरजेनुसार बदलही करण्यात आले. नमुने आणि संक्रमित रूग्ण कसे हाताळाण्यासंबंधी विशेष काळजी घेण्यात आली. WHO ने मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण घोषित केला तेव्हाच भारतीय आरोग्य मंत्रालयाकडून पत्रक जारी करण्यात आलं आणि खबरदारी म्हणून देशभरात मंकीपॉक्सच्या पार्श्वभुमिवर आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असल्याची माहिती ICMR च्या जेष्ठ वैज्ञानिक प्रज्ञा यादव यांनी दिली आहे. तसेच राज्यात आता फक्त मंकीपॉक्सचे दोन रुग्ण सापडले आहेत म्हणून त्यात घाबरुन जाण्यासारखं काहीही नसुन सगळं काही नियंत्रणात असल्याची माहिती डॉ प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)