Free Treatments: आता महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये मोफत होणार सर्व उपचार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
त्याअंतर्गत मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आतापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत उपचार करता येणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळात या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि गरजूंना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयात असे म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार आरोग्याचा अधिकार हा नागरिकांचा अधिकार आहे. त्याअंतर्गत मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयान्वये आता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी रुग्णालय- नाशिक व अमरावती) आणि कर्करोग रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्रातील या सर्व रुग्णालयांमध्ये वर्षभरात सुमारे 2.55 कोटी नागरिक उपचारासाठी येतात. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था असून, या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. (हेही वाचा: ठाण्यात उभे राहणार राज्यातील पहिले 'अवयवदान' थीमचे उद्यान; होणार जनजागृती, मिळणार शास्त्रीय स्वरूपाची माहिती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)