Zomato Healthier Suggestions: झोमॅटोने सादर केले नवीन फिचर; ऑर्डर करताना ग्राहकांना मिळणार 'हेल्दी अन्नपदार्थां'चा पर्याय

दीपंदर गोयल म्हणतात की, सुरुवातीला, कंपनीने नानसाठी रोटी हा पर्याय दाखवायला सुरुवात केली आहे आणि जवळजवळ 7% लोकांनी या पर्याय स्वीकारला आहे.

Zomato

Zomato Healthier Suggestions: ऑनलाइन फूड ऑर्डर करणारी कंपनी झोमॅटो (Zomato) आता ग्राहकांना हेल्दी खाण्यास मदत किंवा प्रत्साहित करणार आहे. झोमॅटोने एक नवीन फिचर सादर केले आहे, ज्याद्वारे ऑर्डर करताना ग्राहकांना 'हेल्दी अन्नपदार्थां'चा पर्याय मिळणार आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी माहिती दिली की, झोमॅटोवर सुरु करण्यात आलेल्या या नवीन फीचर अंतर्गत, जेव्हा वापरकर्ते अन्नपदार्थ ऑर्डर करतील, तेव्हा त्यांना त्यासोबत एक हेल्दी ऑप्शन देखील दाखवला जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही काही गोड पदार्थ ऑर्डर करत असाल तर तुम्हाला कमी कॅलरी मिठाई निवडण्याचा पर्याय दिला जाईल. दीपंदर गोयल म्हणतात की, सुरुवातीला, कंपनीने नानसाठी रोटी हा पर्याय दाखवायला सुरुवात केली आहे आणि जवळजवळ 7% लोकांनी या पर्याय स्वीकारला आहे. या फीचरला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनी हे फिचर लवकरच इतर पदार्थ आणि श्रेणींमध्ये वाढवेल. (हेही वाचा: Fake-Paid Reviews: ग्राहकांना दिलासा! Amazon, Flipkart, Myntra सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना लवकरच काढून टाकावे लागतील 'फेक रिव्ह्यूज'; सरकार उचलणार कडक पावले)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now