Best Desserts In The World: भारतामधील Ras Malai आणि Kaju Katli यांचा जगातील सर्वोत्कृष्ट मिष्टान्नांमध्ये समावेश; Taste Atlas ने जारे केली यादी
यामध्ये भारतातील रस मलाई आणि काजू कतली यांना स्थान मिळाले आहे.
भारत देश हा जसा इथल्या कला-संस्कृतीसाठी ओळखला जातो, तसेच तो खाद्यपदार्थांसाठी देखील ओळखला जातो. देशातील विविध ठिकाणचे अनेक पदार्थ जगभरात आवडीने खाल्ले जातात. आता टेस्ट ऍटलसने (Taste Atlas) जगातील 50 सर्वोत्कृष्ट मिष्टान्नांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील रस मलाई आणि काजू कतली यांना स्थान मिळाले आहे. या यादीत रस मलाई 31 व्या क्रमांकावर असून, काजू कतलीला 41 वा क्रमांक मिळाला आहे.
या यादीत फ्रान्सची क्रेप्स (Crepes) नावाची डिश पहिल्या क्रमांकावर आहे. ब्राझीलचा Bombocado दुसऱ्या क्रमांकावर, पेरूचा Queso helado तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर इटलीचा tiramisù, फ्रान्सची Crème brûlée पाचव्या क्रमांकावर, सहाव्या क्रमांकावर तुर्कियेचा Dondurma, सातव्या क्रमांकावर अर्जेंटिनाचा Alfajores, अर्जेंटिनाचा Dulce de leche आठव्या क्रमांकावर, फ्रान्सची Soufflé au chocolat नवव्या क्रमांकावर, तर दहाव्या क्रमांकावर पोलंडचा Sernik आहे. (हेही वाचा: Most Legendary Dessert Places: पुण्याची Kayani Bakery आणि मुंबईची K Rustom जगातील '150 सर्वात प्रसिद्ध मिठाई ठिकाणे' मध्ये समाविष्ट, पहा संपूर्ण यादी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)