Shivrajyabhishek Din 2024 Wishes: शिवराज्याभिषेक दिन निमित्त रोहित पवार, अमित देशमुख यांच्यासह मान्यवरांकडून मंगलमय शुभेच्छा!

शिवराज्याभिषेक दिन । File Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती निमित्त आज सोशल मीडीयात शिवभक्तांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी झाला होता. महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. शिवरायांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी  रोहित पवार, गिरीश महाजन, अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)