Republic Day Parade 2023 Live Streaming: 74व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानित्त दिल्ली येथील कर्तव्य पथावरील ध्वजारोहण आणि संचलन इथे पाहा लाईव्ह
भारत आज (26 जानेवारी) आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. उत्सवाचा एक भाग म्हणून, दिल्लीतील कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन 2023 परेड आयोजित केली जात आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) आपल्या YouTube चॅनेलवर प्रजासत्ताक दिन परेड 2023 चे लाईव्ह स्ट्रीमिंग होस्ट करत आहे. प्रजासत्ताक दिन परेड 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्यपथावर तिरंगा किंवा राष्ट्रध्वज फडकवतील. सकाळी 10 वाजता परेड सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिन परेड 2023 दरम्यान, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र यासारख्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 17 झलक , आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ ऐतिहासिक वारशाची झलक सादर करणार आहेत.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)