National Science Day 2023: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार; काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या

22-28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत केंद्रावर विविध शैक्षणिक कार्यक्रम, नामवंत शास्त्रज्ञ/तज्ञांची व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय विज्ञानदिन साजरा करणार आहे.

National Science Day (PC - Twitter)

National Science Day 2023: रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवशी सी.व्ही रामन यांनी 'रामन इफेक्ट'चा शोध जाहीर केला ज्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. या निमित्ताने देशभरात थीमवर आधारित विज्ञान संवाद उपक्रम आयोजित केले जातात. यंदा राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम 'ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीइंग', अशी आहे. याशिवाय राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 22-28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत केंद्रावर विविध शैक्षणिक कार्यक्रम, नामवंत शास्त्रज्ञ/तज्ञांची व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय विज्ञानदिन साजरा करणार आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये विज्ञानाचे महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शन, व्याख्याने, विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement