Ganesh Chaturthi 2023: देशभर गणेश चतुर्थीचा उत्साह; लालबागचा राजा मंडळ, सिद्धिविनायक मंदिरात भाविकांच्या गर्दीत आरती संपन्न
आजपासून पुढील दहा गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सारा देश बाप्पाच्या भक्तीत तल्लीन असतो.
भारतामध्ये आज गणेश चतुर्थीचा उत्साह आहे. घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्येही आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सवाची सुरूवात करण्याची लगबग सुरू झाली आहे. मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह मोठा असतो. लालबागचा राजा मंडळ, गणेशगल्लीचा गणपती यांसह अनेक छोटे मोठे गणपती पहायला भाविक बाहेर पडतात. दरम्यान आज गणेश चतुर्थी दिवशी पहाटेच लालबागच्या राजा मंडपात भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये आरती पार पडली आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्येही बाप्पाची आरती संपन्न झाली आहे.
पहा लालबागचा राजा
सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी
गणेश टेकडी नागपूर
तमिळनाडू मधील गणेशोत्सव
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)