Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त काढा या आकर्षक रांगोळी डिझाईन्स; Watch Video

तुम्हालाही या दिवशी घराच्या अंगणाची शोभा वाढवायची असेल, तर तुम्हीदेखील खालील व्हिडिओज पाहून आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढू शकता.

Haldi Kumkum 2023 Rangoli Designs (PC- YouTube)

Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: हळदी-कुंकू (Haldi Kumkum 2023) समारंभ ही एक हिंदू परंपरा आहे. यात विवाहित महिला हळद आणि कुंकवाची देवाणघेवाण करतात. हळदी-कुंकू हे पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया मोठ्या थाटामाटात एकत्र येतात आणि हा दिवस मोठ्या थाटात साजरा करतात. या दिवशी सर्व स्त्रिया साड्या नेसतात. हळदी-कुंकूवाच्या दिवशी स्त्रिया विविध कार्यक्रम राबवतात. या दिवशी घराची सजावटही केली जाते. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर छान रांगोळ्या काढल्या जातात. तुम्हालाही या दिवशी घराच्या अंगणाची शोभा वाढवायची असेल, तर तुम्हीदेखील खालील व्हिडिओज पाहून आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढू शकता.

Haldi Kumkum 2023 Rangoli Designs: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)