Diwali Padwa 2023 Rangoli Designs: दिवाळी पाडव्यानिमित्त घरासमोर काढा 'या' आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स, Watch Video
या दिवशी खास रांगोळी काढून तुम्ही या दिवसाला अधिक चांगल्या प्रकारे साजरे करू शकता. दिवाळी पाडव्यानिमित्त तुम्ही खालील रांगोळी डिझाईन्स आपल्या घरासमोर काढू शकता.
Diwali Padwa 2023 Rangoli Designs: यंदा 14 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अतिशय शुभ दिवस आहे. लक्ष्मीपूजननंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जात. याशिवाय या दिवशी इतर शुभ कार्यदेखील केली जातात. दिवाळी पाडव्यानिमित्त पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि त्याच्यासाठी निरोगी आरोग्याची प्रार्थना करते. हा दिवस नवविवाहित जोडप्यांसाठी खास असतो. या दिवशी खास रांगोळी काढून तुम्ही या दिवसाला अधिक चांगल्या प्रकारे साजरे करू शकता. दिवाळी पाडव्यानिमित्त तुम्ही खालील रांगोळी डिझाईन्स आपल्या घरासमोर काढू शकता.
दिवाळी पाडव्यानिमित्त खास रांगोळी व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)