Akshaya Tritiya Mehndi Design: अक्षय्य तृतीयेच्या सणाला हातावर काढा आकर्षक मेहंदी डिझाईन्स (Watch Video)
अक्षय्य तृतीयेचा सण यंदा 30 एप्रिल दिवशी साजरा केला जाणार आहे.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. हिंदू धर्मीयांसाठी या सणाचं विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार अक्षय्य तृतीयेला दिलं जाणरं दान हे कधीच क्षय पावत नाही म्हणजेच कधीच संपत नाही. त्यामुळे या दिवशी शक्य त्या गोष्टीचं दान केले जाते. यामध्ये धनधान्यांपासून अगदी पाणी देण्याचीही रीत आहे. सण म्हटला की नटणं-मुरडणं हे आलंच. सध्या लग्न सराईचा देखील काळ आहे. मग अशा निमित्ताने सण समारंभ आणि लग्न सराई जोडून तुम्ही काही आकर्षक मेहंदी डिझाईन्स हातावर काढू शकता. मेहंदी ही शरीराला थंडावा देते, ताण कमी करते त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तुम्ही काही आकर्षक मेहेंदी हातावर काढून या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. Akshaya Tritiya Rangoli: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आकर्षक रांगोळी काढून साजरा करा आनंदाचा सण.
अक्षय्य तृतीया निमित्त हातावर काढा आकर्षक मेहंदी
गोल टिक्की मेहंदी डिझाईन
अक्षय्य तृतीया मेहंदी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)