'Mirzapur The Film' आता मोठ्या पडद्यावर, ॲमेझॉन आणि एक्सेल एंटरटेनमेंटने 2026 मध्ये थिएटरमध्ये रिलीज करण्याची केली घोषणा

ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि एक्सेल एंटरटेनमेंटने नुकतेच जाहीर केले आहे की, मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. मिर्झापूर हा चित्रपट 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, ज्याचा पहिला अनाउंसमेंट व्हिडिओ देखील समोर आला आहे. मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनच्या भरघोस यशाने प्रेरित होऊन हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mirzapur The Film

Mirzapur The Film: मिर्झापूर या लोकप्रिय वेब सिरीजच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि एक्सेल एंटरटेनमेंटने नुकतेच जाहीर केले आहे की, मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. मिर्झापूर हा चित्रपट 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, ज्याचा पहिला अनाउंसमेंट व्हिडिओ देखील समोर आला आहे. मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनच्या भरघोस यशाने प्रेरित होऊन हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात कालीन भैया (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदू) आणि कंपाउंडर (अभिषेक बॅनर्जी) यांसारखी आयकॉनिक पात्रं दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे, तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे त्याचे सहनिर्माते आहेत. पुनित कृष्णाने निर्मित आणि गुरमीत सिंगच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या या चित्रपटाच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

‘मिर्झापूर द फिल्म’ आता मोठ्या पडद्यावर:

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)